आयुष्याच्या सांदीतून दिसलेले जग होते.
चिपाडाच्या आडोशाने लिपलेले जग होते.
भेदरलेल्या नजरेला गवसले असे काही
प्रकाशाचा किरण देऊन टिपलेले जग होते.
संस्थेच्या सचिव यांच्या संस्था अंतर्गत कार्याची प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल.
संस्था अंतर्गत केलेल्या कार्याची प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल. https://youtu.be/xtbI8ajSrKQ

छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयास
युथ फाउंडेशन व मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयास रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आदरणीय अधिष्ठाता डॉ.माया इंदुरकर मॅडम यांच्या शुभहस्ते झाले. त्यानंतर ती रुग्णवाहिका त्यांना सुपूर्द केली.

National Womens Excellence Award2024

जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार व देशातील कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ठ महिला पुरस्काराने सन्मान

दिनांक १० मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यूथ फाउंडेशन व मानवपरिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे तर्फे आयोजित, राष्ट्रीय महिला संसद २०२४ भरवण्यात आली होती. देशभरातील १३८ कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सम्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या श्रीमती. रिंचेन लाम्हो, भारत सरकार तर्फे माँटेनेग्रो देशाच्या ऑनररी काउन्सुलेट डॉ. जाणीस दरबारी, भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या श्रीमती अनुज बाला, भारत सरकारच्या अर्जुन अवॉर्डी श्रीमती नसरीन, भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य तसेच फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.आदित्य पतकराव, अभिनेत्री व मॉडल श्रीमती नुपूर मेहता व अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरानी सर्व सन्मानित महिलांचे व भारत भूषण पुरस्कार्थीचे अभिनंदन केले तसेच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे शिस्तप्रिय आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक डॉ. आदित्य युथ फाउंडेशन चे व संस्थेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची संगता करताना डॉ.आदित्य पतकराव यांनी देशभरातील सर्व महिलांनी पुढे येऊन आपल्या देशासाठी असेच योगदान करावे व देशाच्या प्रगतीला हाथभार लावावा अशी आशा व्यक्त केली.
राष्ट्रीय महिला संसद २०२४ च्या कार्यक्रमादरम्यान पुणे येथील श्री. अमोल टेंभरे व श्री. नामदेव तौर यांचा सामाजिक कार्यासाठी
भारत भूषण पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय महिला उत्कृष्ट पुरस्काराने महाराष्ट्रातील खालील महिलांचा सन्मान करण्यात आला

१) श्रीमती. अनुजा साळवी- सामाजिक कार्य (मुंबई)
२) श्रीमती. सुलोचना नामदेव माळी – उत्कृष्ठ शासकीय नोकरी ( सांगली)
३) श्रीमती. कविता भावलाल साळुंखे – उत्कृष्ठ महाराष्ट्र पोलीस ( छ. संभाजी नगर)
४) श्रीमती. जयश्री राधाकिसन शिंदे – सामाजिक कार्य (छ. संभाजी नगर)
५.) डॉ. ज्योत्सना रामराव अड्डे – दंत क्षेत्रातील पेटंट होल्डर ( अंबाजोगाई)
६) डॉ. भाग्यश्री कुलकर्णी – सामाजिक कार्य ( धुळे)
७) श्रीमती अर्चना वैद्य – व्ही. जे . एन. टी सेल विशेष कार्य तसेच सामाजिक कार्य (पुणे)

तसेच विशेष पुरस्कार्थी म्हणून
१) श्रीमती कामाक्षी शर्मा – सायबर सेक्युरेटी ऍक्टिविस्ट ( नवी दिल्ली)
२) श्रीमती अर्चना राव – दाक्ष्यानात्य अभिनेत्री ( बेंगलोर)
आदींचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

दूरसंचार मंत्रालय भारत सरकारचे सल्लागार सदस्य यांनी लोकसभा अध्यक्ष माननीय श्री.ओम बिर्लाजी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना संस्थे मार्फत चालणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

७ जानेवारी २०२४ रोजी
युथ फॉउंडेशन व मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संविधान संरक्षण समिती दापोडी, माध्यमिक – उच्चमाध्यमिक शिक्षण शिक्षक प्रसारक मंडळ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच झालेल्या अनेक वयोगटाच्या मॅरेथॉन स्पर्धेस अनेक नामांकित शाळा,महाविद्यालयांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळला.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच SYMBOL OF KNOWLADGE यां नावाने मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जवळपास १,००० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
विजेत्यास आकर्षक प्रथम पारितोषक म्हणून सायकल रोखरक्क्म व जिल्हास्तरीय प्रमाणपत्र देण्यात आली , द्वितीय, तृतीय, चतुर्थ विजेत्यास रोख रक्कम, ट्रॉफी व जिल्हास्तरीय प्रमाणपत्र व प्रत्येक सहभागी स्पर्धेकास जिल्हास्तरीय प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार चे सल्लागार सदस्य, माजी नगरसेवक संजय नाना काटे जी, व अनेक उच्चशिक्षित आदर्श व्यक्तिमत्व उपस्तिथीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री.अप्पा गायकवाड, अक्षय जी गायकवाड, सचिन जी शेलार Sachin Shelar , सचिन जी गावडे, दापोडी मित्र परिवार व डॉ. आदित्य पतकराव युथ फाउंडेशन चे सदस्य यांनी केले.
कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रिकरण
श्री.नामदेव तौर, श्री. अमोल काळे व डॉ. सौरभ भांडेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. अप्पा गायकवाड व श्री. सचिन शेलार यांनी केले.
आभार प्रदर्शन मांडत असताना प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.आदित्य पतकराव यांनी सर्व स्पर्धकांचे व त्यांच्या पाल्यांचे व शिक्षकांचे आभार मानले. तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन आपण सर्वांनी सदैव देशसेवेस वाहून दिले पाहिजे असे सांगून कार्यक्रमाची सांगता केली.
सर्व आयोजक, सहभागी स्पर्धक, पालक, शिक्षक वर्ग, पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवधिकरी यांचे मन:पासून आभार.

संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री योगेश्वरी नूतन विद्यालय (मंदीर विभाग) अंबाजोगाई यांना संस्थेच्या वतीने नवीन दोन पाण्याचे ज्यार देण्यात आले.
संस्थेच्या वतीने कराड तालुक्यात बाहेरच्या राज्यातून आलेल्या ट्रकचालकांना लॉकडाऊनच्या काळात भोजनाची व्यवस्था केली.